ओखीग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करून मदतकार्य सुरु करा

ओखीग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करून मदतकार्य सुरु करा

शरद पवार यांची मागणी केली

मुंबई : लक्षद्वीप,तामिळनाडू ,केरळ या राज्यांना ओखी वादळाचा जोरदार फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने त्याठिकाणी तात्काळ मदतकार्य आणि पुनर्वसनाचे कामही हाती घेण्यात आले आहे.शिवाय अडचणीत आणि संकटात सापडलेल्या लोकांना पक्षाच्यावतीने आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.

दरम्यान लक्षद्वीप,तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांना ओखी वादळाचा तडाखा बसून प्रचंड नुकसान झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिन्ही राज्यांनी आणि केंद्र सरकारने  नुकसान झालेल्या लोकांचे तात्काळ पुनर्वसन आणि त्यांना मदतकार्य सुरु करावे अशी मागणी केली आहे.

Previous articleज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन
Next articleडाॅ.आंबेडकर स्मारक भाजप सरकारने जाणीवपूर्वक रखडवले