आज कोल्हापूरात नारायण राणे काय बोलणार ?

आज कोल्हापूरात नारायण राणे काय बोलणार ?

कोल्हापूर : काँगेसला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री आणि महाराष्‍ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांची आज सायंकाळी ७ वाजता कोल्हापूरातीत ऐतिहासिक दसरा चौकात सभा होणार असून,या सभेत नारायण राणे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे यांच्या सभेची तयारी करण्यासाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्ते झटत लागले आहेत. काॅग्रेसला सोडचिठ्ठी देताना काॅग्रेसह शिवसेनेवर प्रहार करणा-या नारायण राणे यांना शिवसेनेने केलेल्या तीव्र विरोधामुळे विधानपरिषद पोटनिवडणूकीत उमेदवारी देण्यात आली नाही. त्याच काल पार पडलेल्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी विरोधकांची फोडलेली मते यावरही राणे भाष्य करण्याची शक्यता आहे. आज होणा-या सभेत राणे हे काॅग्रेसह शिवसेनेवर टीकेचे प्रहार करण्याची शक्यता आहे. आजच्या जाहीर सभेनंतर नारायण राणे हे उद्या सांगली आणि कराडचा दौरा करणार आहेत.

 

Previous articleनाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा
Next articleएकरी ३ क्विंटल कापूस निघतोय…कसं जगायचं…शेतकऱ्यांचा सवाल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here