विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाची धडक
नागपूर: काॅग्रेस राष्ट्रवादी काॅग्रेसचा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा येथिल मॉरिस कॉलेज चौकात पोहचला असून, या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले आहे. या मोर्चाला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित आहे.
व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मुकुल वासनिक अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे , खा.सुप्रिया सुळे पतंगराव कदम, प्राचार्य. जोगेंद्र कवाडे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते खासदार आमदार प्रमुख पदाधिकारी उपस्थित
काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर जोरदार टिका केली.जनसामान्यांचा आक्रोश बुलंद करण्यासाठी हा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा असल्याचे सांगत,खोटं बोल रेटून बोल असे या सरकारचे काम आहे.केंद्रात आणि राज्यात खोटारडे सरकार असल्याची टोलाही त्यांनी आपल्या भाषणात लगावला.महाराष्ट्र गुन्हेगारीत अग्रेसर असून,आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही नसल्याचेही चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले.










