राज्यातील ४४४ धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट

राज्यातील ४४४ धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट

नागपूर : महाड येथिल सावित्री पुलावरील दुर्घटनेला दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी धोकादायक असलेल्या पुलांची दुरूस्ती अद्यापही झालेली नाही. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या एकूण १३ हजार १५१ पुलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी धोकादायक बनलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्यात आले आहे. या पुलांच्या दुरूस्तीसाठी ७९२ कोटीचा खर्च लागणार असल्याने उपलब्ध निधीनुसार प्राधान्याने दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

Previous articleविधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाची धडक
Next article……जेव्हा परिवहन मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा वाट चुकतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here