नॉन क्रिमीलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख रुपये

नॉन क्रिमीलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाखावरून ८ लाख रुपये

नागपूर : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती,गट याकरीता (नॉन क्रिमीलेअर) उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपयांवरुन ८ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारने २४ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार कुटुंबाची मर्यादा ४.५० लाख वरून ६ लाख केलेली होती. केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये ही उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रूपये केली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाने ही मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रूपये करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.

राज्य शासनाने राज्य लोकसेवा अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, निरधीसुचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षण अधिनियम अन्वये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती,गट वगळून आरक्षणाचे फायदे लागू करण्यात आलेले आहेत.

Previous articleमुंबई बँकेची आर्थिक स्थिती चांगली
Next articleआर्थररोड कारागृहातून छगन भुजबळ यांचे सरकारला पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here