इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मराठंमोळं स्वागत

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे मराठंमोळं स्वागत

मुंबई : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे आज मुंबईत आगमन झाले असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी तुतारी वाजवून त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी शामलाल गोयल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विमानतळाच्या बाहेर इंडो-ईस्त्राईल फ्रेंडशिप असोसिएशनच्या सदस्यांनी भारत ईस्त्राईल मैत्री चिरायूच्या घोषणांनी प्रधानमंत्री नेतन्याहू यांचे स्वागत केले. ‘शालोम नेतन्याहू !’अशा घोषणांही निनादल्या. चिमुकल्यांनी भारत आणि इस्त्राईलचे ध्वज फडकवत स्वागत केले. प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या सोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळाचेही आगमन झाले.

Previous articleकुष्ठरुग्णांच्या चांगल्या सोयीसुविधांसाठी प्रयत्न करणार
Next articleमहाराष्ट्र बिझनेस लिडर