नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफ ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफ ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली : नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ याला यंदाचा (वर्ष २०१७) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील १८ बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ इजाज अब्दुल रौफ चा समावेश आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्ष गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.

 

Previous articleकारवाई केलेल्या ठिकाणांची आयुक्त पुन्हा पाहणी करणार
Next articleमहावितरणच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतक-यांवर आत्महत्यांची वेळ