पतंजलीवर सरकारचे इतके प्रेम का ?

पतंजलीवर सरकारचे इतके प्रेम का ?

धनंजय मुंडे यांचा सवाल

हिंगोली : आपले सरकार मार्फत पतंजली ची उत्पादने विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजली वर मेहेरनजर दाखवत आहे. एकाच खाजगी कंपनीचे सरकारचे इतके प्रेम का ? आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानच करायचे असेल स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय आयुर्वेदिक कंपन्यांची आणि महिला बचत गटांची उत्पादनेही आपले सरकार मधून विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पतंजली या स्वतःच्या मर्जीतील खाजगी कंपनीला आपले सरकार ची केंद्र विक्रीसाठी देण्यापेक्षा या राज्यातील हजारो महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने या केंद्रातून विकली तर राज्यातील लाखो गरीब महीलांना रोजगार मिळाला असता , तीन वर्षांपासून महिला बचत गटांना बाजारपेठ देण्याच्या केवळ घोषणा दिल्या जात असल्याचे ते म्हणाले. पंतजली ला सवलतीत प्लॉट, सवलती आणि विक्री साठी दुकानेही दिली जात आहेत सरकार पतंजलीची भागीदार झाली की काय असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.

Previous articleअजितदादांना म्हणतात…टपरीवरची कॉफी लय बेस्ट
Next articleशिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौ-यावर जाणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here