शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौ-यावर जाणार

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौ-यावर जाणार

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे येत्या २६ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकदिवसीय दौ-यावर जाणार आहेत.

२६ जानेवारीला होणा-या या एकदिवसीय सिंधुदुर्ग दौ-यात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयाचा भूमीपुजन सभारंभ आयोजित करण्यात आला असून, दुपारी ते प्रसिध्द आंगणेवाडी येथील भराडी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.

Previous articleपतंजलीवर सरकारचे इतके प्रेम का ?
Next articleदेशाच्‍या प्रगतीत व्‍यापारी बांधवांचे मोठे योगदान