शेतक-याला सातबारा सोबत पतंजलीचा काढाही घ्यावा लागेल

शेतक-याला सातबारा सोबत पतंजलीचा काढाही घ्यावा लागेल

धनंजय मुंडे

हिंगोली ( वसमत ) : पतंजली सारख्या खाजगी कंपनीच्या आहारी गेलेल्या या सरकारमुळे उद्या शेतक-याला सेवा केंद्रातून साधा सात बारा घेताना तहसीलदाराने बळजबरीने दिलेला पतंजलीचा काढा, आवळा अन टूथ पेस्ट हि घ्यावी लागेल अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

तहसीलदाराकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला यापुढे पतंजलीचे उत्पादने विकले जातील, रामदेव बाबाचा व्यावसाय वाढावा यासाठी हे भाजप सरकार आपले मुलभूत अधिकार पणाला लावत आहे अशी खरमरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर केली.हल्लोबोल आंदोलानानिमित्ताने वसमत येथे आयोजित सभेत ते बोलत होते. राज्य सरकार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार’ नावाचे दोन केंद्र स्थापन करणार आहे. या केंद्रांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सर्व सेवांचा समावेश होता मात्र सरकारने त्यात आणखी एका सेवेची भर पडली आहे ती म्हणजे बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ प्रोडक्ट्सची,  माहिती व तंत्रज्ञान विभागाने शासनाचा हा निर्णय प्रसिद्ध केला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना आपले अधिकार पणाला लावणाऱ्या या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लोबोल आंदोलनामार्फत रोष व्यक्त करा असे आवाहन मुंडे यांनी जनतेला केले.

Previous articleमनोहर जोशी, सुधीर जोशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत ?
Next articleआता शिवसैनिकांच्या बोटात वाघाची अंगठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here