आता शिवसैनिकांच्या बोटात वाघाची अंगठी

आता शिवसैनिकांच्या बोटात वाघाची अंगठी

मुंबई : शिवबंधनानंतर आता शिवसैनिकांच्या बोटात वाघाची अंगठी बघायला मिळणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसैनिकांना शिवबंधनात बांधल्यानंतर आता शिवसैनिकांच्या बोटामध्ये शिवसेनेचे चिन्ह असणा-या वाघाची अंगठी बघायला मिळणार आहे. कुलाबा विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक कृष्णा पवळे यांनी ही वाघाची अंगठी बनवली आहे असून, तरूण शिवसैनिकांमध्ये या अंगठीचे मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे. या विभागात खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते या वाघाच्या अंगठींचे आज वाटप करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ उपस्थित होते.या अंगठीने शिवसैनिकामधिल असणारा आत्मविश्वास आणखी बळावेल असे खा. सावंत यांनी सांगितले. ही अंगठी शिवसैनिकांची ओळख असेल अशी प्रतिक्रिया कृष्णा पवळे यांनी दिली.

Previous articleशेतक-याला सातबारा सोबत पतंजलीचा काढाही घ्यावा लागेल
Next articleमंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या ८४ वर्षाच्या शेतक-याची प्रकृती गंभीर