रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहतांना हटवले

रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहतांना हटवले

मुंबई : शिवसेनेच्या पालकमंत्र्यांमध्ये बदल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहतांची उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची पालकमंत्री म्हणून नेमणूक केली आहे.

रायगड जिल्ह्यातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या बद्दल प्रचंड नाराजी होती. या नाराजीमुळेच मेहता यांना पालकमंत्रीपदावरून हटविण्यात आले असल्याची चर्चा आहे. रायगड जिल्हयाचे नवे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. भाजप कार्यकर्त्यांची प्रकाश मेहता यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. पालकमंत्री म्हणून प्रकाश मेहतांनी मुख्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी गैरहजर राहिले आहेत.

Previous articleअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पतंजली योगपीठाला भेट
Next articleमंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशच्या पेपरची फेरतपासणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here