उध्दव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

उध्दव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रथमच होणा-या या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी स्थानिकांसह शिवसेना पक्ष पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. नाणार येथिल प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिकांनी केलेल्या विरोधाला शिवसेनेचा पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज ही भेट होणार आहे.उध्दव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई हे असणार आहेत. नाणार प्रकल्प कोकणात आणण्यात शिवसेनेचाच पुढाकार होता असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली होती. या प्रकल्पावरून दोन्ही पक्षात ब-याचदा खटके उडाले असल्याने आजच्या भेटीकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

Previous articleअधिकृत चाळीत राहणाऱ्या रहिवाश्यांना’झोपु’तून घरे देण्याचा प्रस्ताव !
Next articleमोदीजींचे पुस्तक परीक्षेची भिती आणि तणाव दूर करेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here