मोदीजींचे पुस्तक परीक्षेची भिती आणि तणाव दूर करेल
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असणा-या ‘एग्जाम वॉरीयर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. दिव्यज फाउंडेशन द्वारे आयोजित ‘एग्जाम वॉरीयर्सच्या’ ह्या प्रकाशन प्रसंगी ब्ल्यूक्राफ्टचे अध्यक्ष एडव्होकेट हितेश जैन, दिव्यज फाउंडेशनची पल्लवी श्रीवास्तव, ‘परमवीरच्या’ लेखिका मंजू लोढ़ा, केविन शाह उपस्थित होते. अमृता फडणवीस, आमदार लोढ़ा यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना ‘एग्जाम वॉरीयर्सच्या’ पुस्तकाचे वाटप केले. पेंग्विन बूक्स व ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनद्वारे प्रकाशित ‘एग्जाम वॉरीयर्समध्ये’ पंतप्रधान मोदींचा सर्व भर मुलांच्या मनातून परीक्षेची भिती दूर करण्याच्या व तणावमुक्त राहण्याच्या उपायांवर आहे.
दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील शारदा मंदीर शाळेत आयोजित ‘एग्जाम वॉरीयर्सच्या’ मुंबईतील प्रकाशन कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले की, मुले व विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भिती संपवण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल. त्यांनी म्हटले की, कोणत्याही प्रकारची भिती आपल्याला कमकुवत बनवत असते. पण जर आपला दृढ निश्चय असेल तर आपल्याला कोणीही यशापासून दूर ठेवू शकत नाही. सौ.फडणवीस यांनी मुलांना निर्भय प्रकारे आपल्या जीवनाच्या विकासासाठी योग्य व उचित व सशक्त मार्गाची निवड करण्याची सूचना केली. भाजपा राज्य उपाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांनी या प्रसंगी म्हटले की,प्रत्येक क्षणातील जीवन ही एक परीक्षा आहे आणि पंतप्रधानांच्या या पुस्तकामध्ये फक्त सोपे व व्यावहारिक उपायच सांगितले गेलेले नाहीत, तर परीक्षेला कसे सामोरे जावे, हे पंतप्रधानांनी आपल्या अनुभवांद्वारेसुद्धा विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमामध्ये पुस्तकाचे प्रकाशक ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनचे अध्यक्ष एडव्होकेट हितेश जैन यांनी हे पुस्तक म्हणजे पंतप्रधान मोदींचा विद्यार्थी व मुलांना आपल्या जीवनाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हटले. प्रसिद्ध पुस्तक‘परमवीरच्या’ लेखिका श्रीमती मंजू लोढ़ा यांनी या प्रसंगी म्हंटले की, ‘एग्जाम वॉरीयर्स’ वाचून जाणवेल की, जीवनात अंक व गुणतालिकेचे महत्त्व अतिशय थोडे आहे. वास्तविक जीवनामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे तर ज्ञान आहे. पंतप्रधान मोदींच्या या पुस्तकातून प्रेरणा घेऊन जीवनाच्या प्रत्येक अंगामधून सर्व प्रकारची भिती काढून टाकावी, अशी सूचना विद्यार्थ्यांना केली. ये कार्यक्रमाला ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी, शारदा मंदीर शाळेंच्या ट्रस्टी प्रशांत दाणी आणि जयेश जरिवाला, शिक्षक पालक संघटनेचे उर्शित शाह, व पालक आणि शिक्षकाबरोबर काही अन्य मान्यवर उपस्थित होते.