मेक इन महाराष्ट्रामधून किती गुंतवणूक,रोजगार मिळाले याचे उत्तर द्या

मेक इन महाराष्ट्रामधून किती गुंतवणूक,रोजगार मिळाले याचे उत्तर द्या

सुनिल तटकरे

नंदुरबार ( नवापूर विसरवाडी ) : भाजप सरकारने मॅग्नेटिक परिषद मुंबईमध्ये भरवली असून हा फक्त आभास निर्माण केला जात आहे. याआधी मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील कुठल्या जिल्हयात आणि तालुक्यात ८ लाख कोटींची गुंतवणूक झाली आणि कोणत्या जिल्हयात रोजगार उपलब्ध झाला याचं उत्तर मुख्यमंत्री तुम्ही द्या असे आव्हान प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नवापूरच्या जाहीर सभेत दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनातील नवापूर येथील अकरावी सभा होती. या सभेलाही मोठी प्रतिसाद मिळाला. यावेळी सुनिल तटकरे बोलत होते.साडेतीन वर्षात आपल्या पदरामध्ये नेमकं काय पडलं हे पाहण्याची गरज आहे. या सरकारने फक्त आपल्याला फक्त आश्वासनांपलीकडे काहीही दिलेले नाही. आज जमीनींच्या योग्य मोबदल्यासाठी किती धर्मा पाटलांचे बळी सरकार घेणार असा संतप्त सवालही सुनिल तटकरे यांनी सरकारला विचारला.

Previous article२०२२ पर्यंत पायाभूत सुविधा उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा
Next articleमॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे फक्त “स्वप्नरंजन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here