मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे फक्त “स्वप्नरंजन”

मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे फक्त “स्वप्नरंजन”

मुंबई : ममॅग्नेटिक महाराष्ट्रच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा महाराष्ट्राने जुमलेबाजी अनुभवली असून,तीच तीच आश्र्वासने , आणि त्याच त्याच घोषणा करण्यात येत आहे.मागील साडे तीन वर्षात राज्यातील प्रत्येक समाजघटकाची स्थिती खालावलेली असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे स्वप्नरंजन असल्याची टीका विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्र नव्हे तर फ्रस्ट्रेटेट महाराष्ट्र घडला असून, शेतकरी ,व्यापारी, कामगार, तरूणाई अशा प्रत्येक घटकात निराशेचे वातावरण आहे.मित्रपक्ष शिवसेना आणि एकनाथ खडसे,आशिष देशमुखांसारखे भाजप नेते सुध्दा नैराश्याने ग्रासले असल्याचा टोला विखे यांनी लगावला आहे.मॅग्नेटचे दोन गुणधर्म म्हणजे तो जवळ खेचतो, तर दुसरा दूर ढकलतो.भाजपचा मॅग्नेटिक महाराष्ट्र दुस-या पठडीतला आहे.हे सरकार सर्वसिमान्यांना आकर्षित करणारे नव्हे,तर त्यांना दूर ढकलणारे ठरले असल्याची घणाघाती टीका विखे यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्रावरून आत्मस्तुती करण्याऐवजी फ्रस्ट्रेटेड महाराष्ट्राबाबत आत्मपरीक्षण केले असते तर कदाचित महाराष्ट्राच्या पदरात काही तरी पडले असते.पण या मॅग्नेटिक महाराष्ट्रातून काहीही हाती लागेल असे वाटत नाही अशी टीका विखे यांनी आज मुंबईत पार पडलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमावर केली आहे.

Previous articleमेक इन महाराष्ट्रामधून किती गुंतवणूक,रोजगार मिळाले याचे उत्तर द्या
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here