मार्च २०१९ पर्यंत मुंबई – गोवा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करणार!

मार्च २०१९ पर्यंत मुंबई – गोवा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करणार!

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

मुंबई : मुंबई – गोवा महामार्गामधील बहुतेक अडथळे दूर झाले असून, जमिन संपादन हा मुख्य अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येत्या मार्च २०१९ पर्यंत मुंबई गोवा मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी म्हणाले की, मुंबई – गोवा जलवाहतुसाठीही आपण प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशी कंपनीला त्याचा आरखडाही तयार करण्यास सांगितले आहे, असे गडकरी म्हणाले. मुंबई-अलिबाग रोरो सेवाही लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने गडकरी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्रातील राष्ट्रीय महामार्गांची जास्तीत कामे या वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी २ लाख ८२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Previous articleएकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्चपासून सुरू करा
Next articleदोषी असेल तर सरकार तुरुंगात का टाकत नाही !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here