औरंगाबाद येथिल कचरा प्रश्न उद्या मार्गी लागणार !

औरंगाबाद येथिल कचरा प्रश्न उद्या मार्गी लागणार !

आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : औरंगाबाद शहरातील कच-याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, येथिल खदान परिसरात तात्पुरता कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत.

औरंगाबाद शहरातील कच-याचा प्रश्न विधानसभेत गाजला असतानाच आज या प्रश्नी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. औरंगाबाद येथिल खदान परिसरात तात्पुरता कचरा टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हे प्रकरण पोलिसांना हे प्रकरण संयमाने हाताळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तर ; उद्या महानगरपालिका आयुक्त आणि शिवसेनेचे खासदार आमदार संबंधित भूखंडाची पाहणी करणार आहेत. आजच्या भेटीत उद्या औरंगाबाद येथिल कचरा प्रश्न मार्गी लागेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

Previous articleआणीबाणीच्या काळात लढा दिलेल्या सत्याग्रहींना पेन्शन
Next articleमुंबईतील ७५० चौरस फुटापर्यंतच्‍या घरांचा मालमत्‍ता कर माफ करा