खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित

खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित

गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : खेड तालुक्यातील ऐनवली-मोहाने येथील मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला व तिची हत्या केली.परंतु पोलीसांनी या मुलीने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करून सदर प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न सुरु केला.

या प्रकरणाचेवपडसाद आज विधानसभेत उमटले. आज विधानसभेत लक्षवेधीव्दारे हा प्रश्न उपस्थितीत होताच गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी या प्रकरणाची आठ दिवसात सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देवून, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करुन त्यांची चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. या प्रकरणी तातडीने कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेच्या आमदारांसह   विरोधक आक्रमक होवून अध्यक्षांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी केली.

Previous article२०१९ पर्यंत राज्यातील सर्व कृषीपंपांना कनेक्शन
Next articleएमपीएससी परीक्षेतील रॅकेटप्रकरणी विरोधकांचा सभात्याग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here