६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान

मुंबई : राज्यातील विविध २५ जिल्ह्यांमधील ६५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ३३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार ८१२ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ मे २०१८ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १६ मे २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २७ मे २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३ पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २८ मे २०१८ रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- ५, पालघर- ३, रायगड- १८७, सिंधुदुर्ग- २, नाशिक- २०, धुळे- ७, जळगाव- ८, अहमदगनर- ७७, पुणे- ९०, सोलापूर- ३, सातारा- २३, सांगली- ८२, कोल्हापूर- ७४, औरंगाबाद- ४, बीड- २, नांदेड- ७, परभणी- १, उस्मानाबाद- ३, लातूर- ५, अकोला- २, यवतमाळ- २९, वर्धा- १४, भंडारा- ४ आणि गडचिरोली- २ एकूण- ६५४

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे (९०)- १६७, पालघर (७३)- १४४, रायगड (९३)- १५८, रत्नगिरी (२०२)- २९९, सिंधुदुर्ग (७४)- १०४, नाशिक (२००)- ३१८, धुळे (३४)- ४९, जळगाव (५७)- ९६, नंदुरबार (३२)- ३६, अहमदगनर (७८)- १२४, पुणे (२५८)- ४५६, सोलापूर (९३)- १५४, सातारा (४०९)- ७७७, सांगली (४०)- ८१, कोल्हापूर (८७)- १२६, औरंगाबाद (३४)- ४१, बीड (२४)- ३५, नांदेड (१०६)- १७७, परभणी (२८)- ४०, उस्मानाबाद (४८)- ६५, जालना (२१)- २८, लातूर (७९)- ९४, हिंगोली (४१)- ५५, अमरावती (८०)- १२१, अकोला (२३)- ३१, यवतमाळ (११०)- १६७, वाशीम (२०)- २३, बुलडाणा (३९)- ७२, वर्धा (४९)- ७२, चंद्रपूर (७४)- १०६, भंडारा (६)- ४८, गोंदिया (३५)- ४३ आणि गडचिरोली (१७५)- ४६४. एकूण (२८१२)- ४७७१

Previous articleपेट्रोल डिझेलवरील अन्यायी कर कमी करण्याची काॅग्रेसची मागणी
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आ.जयंत पाटील ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here