राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आ.जयंत पाटील ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आ.जयंत पाटील ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गटनेते जयंत पाटील यांची निवड केली जाण्याची शक्यता असून, येत्या २९ एप्रिल रोजी पुणे येथे होणा-या प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांनी अर्ज दाखल केला असून, त्यांची बिनविरोध निवड होणार आहे तर प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक ही येत्या २९ एप्रिल रोजी पुण्यात होणा-या प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात येणार आहे. या पदासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे,ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील इच्छुक आहेत मात्र खासदार सुप्रिया सुळे या आ.जयंत पाटील यांच्या पारड्यात वजन टाकण्याची शक्यता आहे. आ. जयंत पाटील यांची गटनेते म्हणुन विधानसभेत प्रभावी कामगिरी ठरलेली आहे. मुद्देसुद मांडणी आणि खास शैलीतुन ते सत्ताधा-यावर हल्ला करतात या कामगिरीवर आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली जावू शकते असे सुत्रांनी सांगितले.

Previous article६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान
Next articleमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवावा