मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवावा

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवावा

आ. अनिल परब यांचे आव्हान

मुंबई : सर्व शाह आणि मोदी कोकणवासी कधी झाले? कोकणात शेती कधीपासून करू लागले? हे सर्व शेतकरी नसून, जमिनीचे दलाल अशी टिका करतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा विरोध डावलून नाणारसंदर्भात निर्णय करून दाखवावा असे आव्हान शिवसेनेचे उपनेते आ. अनिल परब यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री नाणारवासियांच्या बाजूने उभे राहणार की शाह-मोदी-सिंघवींसारख्या दलालांच्या मागे उभे राहणार हा असा सवालही शिवसेनेचे उपनेते आ.अनिल पत्रकार परिषदेत केला.अधिसूचना काढण्याचा अधिकार जर मंत्र्यांना आहे तर रद्द करण्याचा अधिकारही मंत्र्यांना आहे. उच्चाधिकार समितीला अधिकार आहे आणि मंत्र्यांना नाही असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता हा प्रकल्प ज्यांना करायचा आहे त्यांनी तो करून दाखवावा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवावा, असे आव्हान आ.परब यांनी दिले.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आ.जयंत पाटील ?
Next articleएका दिवसात २३ हजार ७०० मे.वॅ. विजेचा विक्रमी पुरवठा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here