एका दिवसात २३ हजार ७०० मे.वॅ. विजेचा विक्रमी पुरवठा

एका दिवसात २३ हजार ७०० मे.वॅ. विजेचा विक्रमी पुरवठा

मुंबई : महावितरणने आज सोमवार दि नांक २३ एप्रिलला राज्यात २३ हजार ७०० एवढ्या मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले.

राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात आज २३ एप्रिलला 23 हजार ७०० मेगावॅट एवढ्या विजेची कमाल मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने विजेची ही संपूर्ण मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यात वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळे एवढया मोठया प्रमाणातील विजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. २३ एप्रिलला मुंबईची विजेची मागणी ३ हजार ३७५ मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली तर संपूर्ण राज्याची विजेची कमाल मागणी २३ हजार ७०० एवढी नोंदविण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करताना वीज वितरण यंत्रणेत कोणताही बिघाड न होता वीज पुरवठा झाला.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवावा
Next articleशेतकऱ्यावर पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी