कोकणातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही !

कोकणातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही !

खा. नारायण राणे यांचा सेनेला इशारा

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महारास्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला आव्हान दिले असल्याने रायगड – रत्नागिरी – सिंधुुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेने तीव्र विरोध केल्याने नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती तर नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना भाजपची झालेली युती या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत नारायण राणे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आज गुरुवार उमेदवारी अर्ज दाखल कण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांची उत्सूकता ताणली होती. याबाबत पत्रकारांनी खासदार नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या निवडणूकीत आपला उमेदवार उभा करणार नसला तरी कोणत्याही परिस्थितीत कोकण मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही.तर या निवडणूकीच्या निमित्ताने झालेल्या युत्या-आघाड्या याबाबत आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचेही राणे म्हणाले.

रायगड – रत्नागिरी – सिंधुुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातुन राष्ट्रवादी काॅग्रेसने सुनिल तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना शेकाप, मनसेनै पाठिंबा दिला असून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्याशी व पक्षाच्या नेत्यांशी पाठिंब्यासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी दिली.या मतदारसंघात तीन जिल्ह्यात मिळून एकूण ९४१ मतदार आहेत. त्यातील ४६३ हा आकडा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पार करून विजयी होईलच असा दावा तटकरे यांनी केला.

Previous articleवनगा कुटूंबियांचा भाजपला रामराम
Next articleभविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here