एकनाथ खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच

एकनाथ खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच

गिरीश महाजन यांचे वक्तव्य

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चीट दिलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असे सांगतानाच खडसे पुन्हा मंत्रीमंडळात आले तर आनंदच होईल, असे वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या मंत्रीमंडळातील पुनरागमानाबाबत भुमिका स्पष्ट केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. एकनाथ खडसेंना मंत्रीमंडळात घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून, खडसे हे अनुभवी नेते आहेत. यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणूनही तर भाजप सरकारमध्ये मंत्रीही म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने ते मंत्रीमंडळात आले तर त्याचा सरकार आणि भाजपला फायदा होईल. विरोधकांचे काम विरोध करणे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करू शकते नाही अशी टीका विरोधकांवर करतनाच छगन भुजबळ यांचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. कॅांग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातच त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे आमच्या सरकारने त्यांना आत टाकले नाही आणि बाहेरही काढले नाही. असे महाजन यांनी स्पष्ट केले.

Previous articleछगन भुजबळ  सोमवारपासून पुन्हा सक्रीय होतील
Next articleभंडारा गोंदिया राष्ट्रवादीला तर पालघर कॅांग्रेसला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here