छगन भुजबळांची कोठडीतून सुटका….पण !

छगन भुजबळांची कोठडीतून सुटका….पण !

मुंबईः महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी गेली दोन वर्षे कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी प्रत्यक्ष आज रविवारी त्यांची पोलीस कोठडीतून सुटका झाली आहे.

छगन भुजबळ यांच्या सुटकेची कायदेशीर कागदपत्रे घेऊन पोलीस आज केईएम रुग्णालय गेले आणि त्याच्यावर भुजबळांच्या सह्या घेतल्या.आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने भुजबळांना रुग्णालयातून पुन्हा कारागृहामध्ये जावे लागणार नाही.मात्र केईएम रूगाणालयात उपचार घेत असल्याने भुजबळांना घरी सोडायचे की नाही याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. भुजबळांना रूग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्या कुटूंबीयांकडून सांगण्यात आले आहे. उद्या सोमवारी भायखळा येथे एका कार्यक्रमात भुजबळ हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे मेसेज काल समाज माध्यमांवर पाठविण्यात आले होते मात्र काही वेळेतच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भुजबळांना स्वादुपिंडाचा त्रास असून,सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना उपचारांची आणि विश्रांतीची गरज आहे.आज त्यांची कोठडीतून सुटका झाली असली, घरी जाता येईल की नाही, याबाबतच निर्णय डाॅक्टरच घेतील.केईएम मधिल डॉक्टरांकडून आपल्यावर चांगले उपचार केले जात असून, कुटुंबीयांशी चर्चा करुन घरी जाण्याचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Previous articleभुजबळ सोमवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
Next articleपंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना दे धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here