पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना दे धक्का

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना दे धक्का

रमेश कराडांनी घेतली माघार

बीड:  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज मागे घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड यांना राष्ट्रवादीने लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघातुन विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती.

विधानपरिषद निवडणूकीच्या तोंडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मानलेले बंधू रमेश कराड यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी देवून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना आणि भाजपला मोठा धक्का दिला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडेंना मोठा धक्का दिला आहे.कराड यांच्यासोबत राष्ट्रवादी डमी अर्ज दाखल केलेले अशोक जगदाळे यांना हे आता राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.या मतदारसंघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड  परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सहा जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे.

Previous articleछगन भुजबळांची कोठडीतून सुटका….पण !
Next articleधक्का तर निकालाच्या दिवशी असतो – धनंजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here