धक्का तर निकालाच्या दिवशी असतो – धनंजय मुंडे

धक्का तर निकालाच्या दिवशी असतो – धनंजय मुंडे

मुंबई : बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांची आपला उमेदवारी अर्ज मागे घेणे हा धक्का नाही तर  धक्का तर निकालाच्या दिवशी असतो अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कराड यांनी उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे डमी उमेदवार  अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा  दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रमेश कराडांना आम्ही पक्षात घेऊन अस काय झाले की त्यांनी माघार घेतली ? याचे तेच उत्तर देऊ शकतील असे सांगतानाच माझ्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठची आहे, आम्ही ती जिंकूच असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. या मतदार संगातील मतांची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादी-काँग्रेस जिंकेल असे सांगतानाच ,स्वतःच उमेदवारी मागायची, स्वतःच अर्ज काढून घ्यायचा, पहिल्या दिवसापासून हे काही षडयंत्र होते का ? याबद्दल मी आताच बोलणार नाही. खरा धक्का निकालाच्या दिवशी असेल असे मुंडे म्हणाले.

 

Previous articleपंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना दे धक्का
Next articleकार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली बालाजीची शाल आणि पेढे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here