कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली बालाजीची शाल आणि पेढे

कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली बालाजीची शाल आणि पेढे

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया कालच पूर्ण झाली असली त्यांना आणखी ४ ते ५ दिवस औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

भुजबळांवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्या भेटीसाठी त्यांचे समर्थक रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत असल्याचे चित्र आहे.भुजबळांच्या समर्थकांनी आज रूगाणालयात जाऊन भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे भरवून मोठा हार घालून सत्कार केला.तर त्यांच्या भेटीसाठी नाशिकमधील कार्यकर्ते हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत. छगन भुजबळ आज कार्यकर्त्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते  मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. भुजबळ यांची आज सकाळी केईएम रुग्णालयात जावून भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, त्यांना आणखी ४ ते ५ दिवस औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांनी दिली. भुजबळ यांची सुटका झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ते भुजबळांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांची प्रकृती लक्षात घेता ते कुणालाही भेटणार नाहीत. फेसबुक लाईव्हवरही संवाद साधणार नाहीत. प्रकृती स्थिर होईपर्यंत ते उपचार घेतील त्यामुळे कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन  मलिक यांनी केले आहे.

Previous articleधक्का तर निकालाच्या दिवशी असतो – धनंजय मुंडे
Next articleउमेदवाराची माघार ही तर राष्ट्रवादीची अगतिकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here