उद्धव ठाकरे युपीचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ आमने सामने
मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या भाजपने आता शिवसेनेला टक्कर देण्यासाठी पालघर मतदार संघातील उत्तर भारतीयांना आवाहन करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांना प्रचाराच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.तर त्याच दिवशी २३ मे रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची नालासोपारामध्ये प्रचार सभा होणार आहे.
पालघर मतदार संघात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार असल्याने भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या या पोटनिवडणूकीत भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांना प्रचारासाठी उतरविल्यानंतर आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनाच पाचारण केले आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या बुधवारी 23 मे रोजी नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे.तर त्याच दिवशी भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नालासोपाऱ्यात जाहीर सभा होणार आहे.विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे एकाच दिवशी आमने सामने येणार आहेत.