शिवसेना सोबत असो किंवा नसो निवडणुकीच्या तयारीला लागा

शिवसेना सोबत असो किंवा नसो निवडणुकीच्या तयारीला लागा

मुख्यमंत्र्यांचे पदाधिका-यांना आदेश

मुंबई :  शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाकडून युती करण्यासंदर्भात दोन पाऊले पुढे टाकली गेली असतानाही शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.पालघरमध्ये भाजपाला मिळालेल्या यशामुळे शिवसेनेशी युती नसतानाही भाजपा जिंकू शकतो त्यामुळे शिवसेना सोबत असो किंवा नसो आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्यात झालेल्या पोटनिवडणूका झाल्यानंतर दादर येथिल वसंतस्मृती सभागृहात भाजपाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्ष शिवसेना केंद्रीत होता. पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत पक्षाच्या पदरी अपयश आले असले तरी पालघर मध्ये शिवसेनेशी सामना करताना ही पोटनिवडणूक भाजपाला कठीण जाईल असे वाटत होते. परंतु पालघरमध्ये मिळालेल्या विजयामुळे मित्र पक्ष शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो आगामी निवडणूकीच्या तयारीला लागा असा सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Previous articleशेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ : शरद पवार
Next articleशेतकऱ्यांबाबतच्या कोडगेपणाची सरकारला किंमत चुकवावी लागेल!: विखे पाटील