विधानपरिषदेच्या चार जागांसाठी भरघोस मतदान
मुंबई : मुंबई शहरासह उपनगर, कोकणात पावसाची सतंतधार असली तरी आज झालेल्या विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर,मुंबई शिक्षक,कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात भरघोस मतदान झाले.मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३ टक्के ,मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ८३.२६ ,कोकण पदवीधर मतदार संघात ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात ९२.३० टक्के मतदान झाले.
कोकणासह,मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस असतानाच आज विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर,मुंबई शिक्षक,कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी भरघोस मतदान झाले. मुंबई आणि उपनगरात पाऊस असतानाही ५३.२३ टक्के मतदान झाले.तर चुरशीच्या समजल्या जाणा-या मुंबई शिक्षक मतदार संघात ८३.२६ एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले. कोकण पदवीधरसाठी ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात सर्वाधिक ९२.३० टक्के मतदान झाले.
मुंबई पदवीधर मतदार संघातुन शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपाचे अॅड.अमित मेहता, आघाडी आणि शेकापचे अॅड. राजेंद्र कोरडे, अपक्ष उमेदवार दिपक पवार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि मनसेचे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह,१२ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदार संघात एकूण ७४ हजार मतदार होते. मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण १० उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपाचे निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात खरी लढत आहे.नाशिक शिक्षक मतदार संघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, आघाडी पुरस्कृत संदिप बेडसे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रथमच मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे मतदारांनी कोणाला कौल दिला हे येत्या २८ तारखेला होणा-या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.