तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळांची विधानभवनात “एन्ट्री”

तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळांची विधानभवनात “एन्ट्री”

नागपूर : तब्बल दोन वर्षानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नागपूर मधिल विधानभवनात जोरदार एन्ट्री झाली.अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतला.

अधिवेशनाच्या दुस-या आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कामकाजात भाग घेतला. आज कामकाज सुरू होण्यापूर्वी भुजबळ यांचे विधानभवन परिसरात आगमन झाले.त्यांच्या स्वागतासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते आमदार उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी” कौन आया कौन आया, राष्ट्रवादीका शेर आया अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

Previous articleकाँग्रेस प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे उद्या मुंबई दौ-यावर
Next articleपृथ्वीराज देशमुख यांची माघार : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध