राज्यातील आणखी ५४ ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत

राज्यातील आणखी ५४ ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत

मुंबई :  बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत राज्यातील आणखी ५४ ग्रामपंचायतींच्या कार्यालयास स्वतंत्र इमारत बांधण्याच्या दुस-या टप्प्याला राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंजूरी दिली. प्रत्येकी १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून या इमारती उभारण्यात येणार आहेत.

एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीना स्वतःच्या कार्यालयासाठी इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना  पंकजा मुंडे यांनी सुरू केली आहे. या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात ३०२ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला होता. आता पुन्हा दुस-या टप्प्यात १२ जिल्हयातील ५४ ग्रामपंचायतींचा समावेश स्वतंत्र इमारत बांधकामासाठी करण्यात आला असून त्यात अहमदनगर जिल्हयात ०२, पुणे ०९, सातारा ०६, नांदेड ०२, हिंगोली ०५, परभणी ०३, अमरावती ०२ तर नागपूर, अकोला, औरंगाबाद व जालना जिल्हयातील प्रत्येकी एक अशा इमारती बांधल्या जाणार आहेत.

या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात बीड जिल्हयातील ६४ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला होता आता दुस-या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या ५४ पैकी २१ ग्रामपंचायती हया बीड जिल्हयातील आहेत. त्यात बीड तालुक्यातील १०, अंबाजोगाई मधील ०८ आणि आष्टीतील ०३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील आठपैकी सौंदणा, अंबलटेक, वालेवाडी, नवाबवाडी, घोलपवाडी, दरडवाडी हया परळी मतदारसंघातील असून हिवरा खु., कोपरा आणि श्रीपतवाडी हया केजमधील आहेत.

Previous articleजनतेने विकासावर विश्वासाची मोहोर उमटवली – मुख्यमंत्री
Next articleपंकजा मुंडे यांनी प्रचार केलेल्या सर्वच्या सर्व १४ जागा भाजपने जिंकल्या