गली-गली में शोर है…विरोधकांची घोषणाबाजी

गली-गली में शोर है…विरोधकांची घोषणाबाजी

 मुंबई : गली-गली में शोर है…भाजप सरकार चोर है…भाजप सरकार हाय हाय…अशा घोषणा देत आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 आजही मराठा आरक्षण सभागृहाच्या पटलावर ठेवा आणि दुष्काळी मदत जाहीर करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणा करत परिसर दणाणून सोडला.

 विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण आदींसह काँग्रेसचे आमदार, सपाचे आमदार आणि इतर विरोधी पक्षाचे आमदार मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleआरक्षणाच्या मागणीसाठी आ. प्रकाश गजभिये महाराजांच्या वेषात !
Next articleदोन्ही अहवाल सभागृहासमोर ठेवा तरच सभागृह चालू देवू : अजित पवार