मुंबई नगरी टीम
बुलडाणा: राज्यातील फसवणूक सरकारने जिजाऊंचे गाव सिंदखेडराजाचीही फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त सिंदखेडराजा या जिजाऊंच्या जन्मगावी दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी सिंदखेडराजा विकास आराखडा साडेतीनशे कोटी रूपयांचा असून तो पूर्णत्वास नेण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे सांगितले होते.पण कसलाच विकास केला नाही. फसवणूक सरकारने जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे.परंतु जिजाऊंचे जन्मगाव सिंदखेडराजाचीही फसवणूक केली आहे. आमचे सरकार सत्तेत येईल तेव्हा हा विकास आराखडा पूर्ण होईल, याची ग्वाही त्यांनी दिली. जिजाऊंचे जयंतीच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे दरवर्षी येत असतात. त्याप्रमाणे त्या आजही आल्या होत्या.