मुबंई नगरी टीम
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरीही हा संप हाताळण्यात शिवसेनेला सपशेल अपयश आल्याची भावना आहे.याचा संदर्भ घेऊनसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.मराठी मराठी म्हणत शिवसेनेने मराठी माणसालाच लुटले, असा हल्ला त्यांनी शिवसेनेवर चढवला आहे.
ट्विटद्वारे दमानिया यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना कामगारांसाठी कधीही लढत नाही.गिरणी कामगार,खंबाटा एव्हीएशनचे कामगार आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनाही याचा अनुभव आला आहे.मराठी मराठी म्हणत त्यांनी मराठी माणसालाच लुटले, अशी बोचरी टीका दमानिया यांनी केली आहे.तसेच सर्व कामहार संघटनांनी ठाकरे यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.७ जानेवारीपासून बेस्ट कामगार संपावर गेले होते आणि त्यानंतर नऊ दिवस मुंबईकरांचे अतोनात हाल झाले.बेस्टचा संप मिटल्याने दिलासा मिळाला असला तरीही शिवसेना संप हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका सर्वत्र होत आहे.