राजकारणात उतरण्याचा कसलाही विचार नाही : करिना कपूर 

मुंबई नगरी टीम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिने भोपाळ मधून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.राजकारणात उतरण्याचा माझा कसलाही विचार नाही.मला केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचे आहे असे स्पष्ट करीत  करिनाने लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता  नाकारली.

भोपाळच्या जागेवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असल्यामुळे येथून करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि  भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. भोपाळमध्ये काँग्रेसला करीनाच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, त्यामुळे करिनाला उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मात्र चित्रपट हेच माझे ध्येय आहे, मी निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आहे. मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नाही’, असे करीनाने स्पष्ट केले.

Previous articleराहुल गांधी नांदेडमधून लोकसभा लढवणार?
Next articleमहिन्यानंतर माझे लग्न; नंतर तुमचे : खा.उदयनराजे भोसले