राहुल गांधी नांदेडमधून लोकसभा लढवणार?

मुंबई नगरी टीम

नांदेड: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे.नांदेड हा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आहे.तो कॉंग्रेससाठी सुरक्षित मानला जातो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी हेही दोन ठिकाणांहून निवडणूक लढवणार आहेत.

राहुल गांधी यांच्यासाठी नांदेडचा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे.याशिवाय अमेठी आणि मध्यप्रदेशमधील एका जागेचा पर्यायही आहे.राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवण्याचे एकमेव कारण हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.गेल्या वेळेस मोदी लाट असतानाही नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव हे दोनच कॉंग्रेस उमेदवार विजयी झाले होते.राहुल गांधी यांच्याबाबतीत कॉंग्रेस कोणतीही जोखीम पत्करू शकत नाही,असा याचा अर्थ आहे.मात्र कॉंग्रेसचा विजयाचा विश्वास कमी झाला आहे का,अशीही चर्चा आहे.

एका उमेदवाराला दोन ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची निवडणूक आयोग परवानगी देतो.मागे पंतप्रधान मोदीही वाराणसी आणि गुजरातेतूनही विजयी झाले होते.पक्षाच्या हमखास विजयी जागा वाढण्यास याचा फायदा होतो.राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीत सपा आणि बसपाने उमेदवार द्यायचा नाही.त्यामुळे स्मृती इराणी यांचे राहुल गांधी यांच्यापुढे तगडे आव्हान नसेल,असेही बोलले जाते.नांदेडमधून कॉंग्रेसचा सर्वोच्च नेता लढत असेल तर अगोदरच मरगळलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना नवचैतन्य प्राप्त होईल. तीन राज्यांतील कॉंग्रेसच्या विजयामुळे कॉंग्रेसमध्ये  उत्साह आहे.

Previous articleनारायण राणेंना कॉंग्रेसमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : अशोक चव्हाण
Next articleराजकारणात उतरण्याचा कसलाही विचार नाही : करिना कपूर