माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला : एकनाथ खडसे

मुंबई नगरी टीम

जळगाव : माजी मंत्री  आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष केले आहे. सय्यद शुजा या हॅकरने ईव्हीएम हॅकिंग संदर्भात गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक दावा केला होता.तर या हॅकरवर विश्वास कसा ठेवायचा असे उत्तर भाजपने दिल्यानंतर मग माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.

खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवताना भाजपला लक्ष केले. हॅकर सय्यद शुजा प्रकरणी हॅकर खोटारडे असतात असे भाजपने म्हटले तर याच मुद्द्यावरून खडसे यांनी भाजपला सवाल विचारला. माझ्यावरही एका मनीष भंगाळेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली, पण यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या प्रकरणामुळे  माझे राजकीय आयुष्य बरबाद झाले. माझ्याच प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवण्यात आला, असा सवाल खडसे यांनी त्यांनी केला.

Previous articleनितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाहीत: मुनगंटीवार
Next articleजनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात : गडकरी