विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई: विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानेच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचा आरोप ते करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये बोलताना काळ असा आरोप केला होता  २८ तारखेस विधानसभा बरखास्त करण्यात येणार असून दोन्ही निवडणुका एकत्रच घेण्यात येणार आहेत.विधानसभेचे अधिवेशन २८ तारखेला संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील, असा आरोप चव्हाण यांनी केलाहोता.अशोक चव्हाण यांचे वक्तव्य चुकीचे असून सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानेच अशी वक्तव्ये केली जात असल्याचे ते म्हणाले. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.औरंगाबाद मध्ये बोलताना चव्हाण म्हणाले की, विधानसभाएकत्रित होणार असल्याने आता कामाला लागा आणि भाजप सेनेविरोघात मतविभाजन टाळा. निवडणुका जिंकण्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

पंतप्रधान मोदी यांनीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याची सूचना केली होती. मात्रविरोधकांनी कडवा विरोध केला आहे. निवडणुका एकत्र झाल्यास त्याचा फायदा भाजपलाच होतो, हा विरोधकांचाआक्षेप आहे. कारण मतदान लोकसभेला आणि विधानसभेला सहसा एकाच पक्षाला होते. लोकसभेला स्वतः मोदी सभाघेत असल्याने मोदी आणि भाजपचे पारडे लोकसभेला जड असू शकते. त्याचा फायदा विधानसभेला होतो. शिवाय दोन्ही निवडणुकांत वेगळे मुद्दे असतात पण एकत्रित निवडणुका झाल्यास मतदान राष्ट्रीय मुद्यांवर होते आणि स्थानिक मुद्दे बाजूला पडतात,असा विरोधकांचा आरोप आहे.

Previous articleशेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच मुलीवर उपोषणाची वेळ
Next articleआचारसंहितेच्यापूर्वी  राज्यात शिक्षक भरती  होणार