मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब दोडतले

मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब दोडतले

मुंबई नगरी टीम

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब दोडतले यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. तसा शासकीय निर्णय राज्य  सरकारने काढला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री  महादेव जानकर यांनी  राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दोडतले यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

बाळासाहेब दोडतले हे अगदी लहान वयापासूनच महादेव जानकर यांच्यासोबत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. ते मुळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील रहिवाशी आहेत. मंत्री महादेव जानकर यांचे  अत्यंत विश्वासू असलेले दोडतले यांच्यामुळे निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या खूप चांगल्या योजना राज्य सरकार राबवत आहे. समाजातील तळागाळातील सामान्य व्यक्तीला महामंडळाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असल्याचे बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले.

Previous articleधनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार  जाहीर
Next articleराज्यातील ४५१८ गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू