अंतरिम अर्थसंकल्पात होणार सवलतींच्या घोषणा !

अंतरिम अर्थसंकल्पात होणार सवलतींच्या घोषणा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज दुपारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. पुढील चार महिन्यांच्या आर्थिक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात असेल मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वबूमीवर सवलतींच्या अनेक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे.आजच्या तिस-या दिवशी दुपारी दोन वाजता राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होत आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.केंद्र आज केवळ अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अगोदर २००९ व २०१४ या निवडणूक वर्षात तत्कालीन सरकारनेही अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. सरकारच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाही लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसह विविध समाजघटकांसाठी काही घोषणा केल्या जावू शकतात.

या अगोदर जयंत पाटील (२००४), दिलीप वळसे-पाटील (२००९) आणि अजित पवार (२०१४) यांनी अर्थमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.तर आज अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री असतील.

Previous articleनरेंद्र मोदी नव्हे  नितीन गडकरी पुढील पंतप्रधान
Next articleवाचा….अर्थसंकल्पावर कोणत्या नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रिया