मोदी फक्त अ‍ॅडमॅन : राष्ट्रवादीचा टोला

मोदी फक्त अ‍ॅडमॅन : राष्ट्रवादीचा टोला

मुंबई नगरी टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून टीका केली असून, मोदी यांना अ‍ॅडमॅन असल्याचा खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून टोला लगावला आहे. मोदींच्या रूपाने भारताला पंतप्रधान नव्हे तर ‘अ‍ॅडमॅन’ लाभला आहे. कामे झाली नाहीत तरीही भाजपची जाहिरात मात्र प्रथम तयार असते,असे पाटील यांनी म्हटले आहे.मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने केला आहे आणि सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजारांचे कर्ज करून ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

पाटील यांनी म्हटले आहे की,पैसा जनतेचा असला तरीही जाहिरात मात्र भाजपची असते.पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की,नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेत प्रश्न निर्माण झाले आहेत. ३०-४० लाख कोटींचे कर्ज साडेचार वर्षांत वाढले. पण तो पैसा गेला कुठे,असा सवाल पाटील यांनी केला. ३० लाख कोटी रुपये उभे केले, असे सरकार सांगते. तो पैसा कशावर खर्च केला, असे त्यांनी विचारले.देशावर कर्जाचा डोंगर उभा केला.त्यातून संरक्षणावर आणि रस्त्यांवर किती खर्च केले,.याचा हिशोब मोदी सरकारने दिला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. वृत्तपत्रांत पाने भरभरून भाजपच्या जाहिराती येत असल्याबद्दल त्यांनी टीका केली. या जाहिरातींवर कोट्यवधी रूपये खर्च केले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.भाजप कामापेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.  साडेचार वर्षांत वाढलेल्या कर्जाचा हिशोब मोदींना द्यावाच लागेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

 

Previous articleमतदानाच्या दिवशी इव्हीएम तपासा
Next articleमहिला व बालविकास मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा