राज्यात युतीच्या २५ सभा

राज्यात युतीच्या २५ सभा

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार असून 11 एप्रिलला पहिला टप्पा असेल. त्प्रचाराचे धोरण आखून काही पक्ष मैदानात  उतरलेही आहेत. भाजपनेही प्रचाराची जय्यत तयारी केली असून राज्यात २५मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत.यापैकी काही. सभांना मोदी हजर राहणार आहेत.योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते प्रचार करणार आहेत. आहेत. तर काही सभांना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना आणि भाजप युतीची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मोदी आणि ठाकरे हे दीर्घ कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर दिसतील. या सभेचे ठिकाण आणि तारीख अद्याप निश्चीत झाले नसले तरीही  शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या संयुक्त सभेसाठी प्रचंड उत्सुकता आहे.

महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते मंडळी येणार आहेत.भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.राज्यातील ४८ मतदारसंघांमध्येही प्रचार होऊ शकेल, अशा पद्धतीने भाजपकडून पंचवीस सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.यंदा निवडणूक अवघड आहे आणि मोदी लाट नाही.यामुळे भाजपला जास्तीत जास्त प्रचार करावा लागणार आहे.

 

 

Previous articleराधाकृष्ण विखे पाटील प्रचारातून अलिप्त राहणार
Next articleनिवडणूकीच्या तोंडावर भाजपकडून अनेकांची महामंडळावर वर्णी