दक्षिण मध्य मुंबईत कॅांग्रेसचे “क्या हुआ तेरा वादा” आंदोलन

दक्षिण मध्य मुंबईत कॅांग्रेसचे “क्या हुआ तेरा वादा” आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई : आता ख-या अर्थाने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात रंगत येवू लागली आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी  आणि वस्तु व सेवा करासारख्या निर्णयामुळे धारावीतील चर्मौद्योग आणि कपडा व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून, येथिल अर्ध्याहुन अधिक व्यवसाय बंद पडल्याता मुद्दा कॅांग्रेसने आपल्या प्रचारात घेत कॅांग्रेसने विद्यमान खासदार राहुल शेवाळेंच्या  विरोधात क्या हुआ तेरा वादा हे अनोखे आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य हवालदिल झाला असताना विद्यमान खासदार शेवाळे संसदेत मुग गिळून गप्प बसले होते का असा सवाल कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केला आहे.हाच मुद्दयाचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसने क्या हुआ तेरा वादा या नावाचा अनोखा प्रचार राबविण्यास सुरूवात केली आहे. आता येथिल खासदार जेव्हा मतदारसंघात दिसतील तेव्हा येथिल मतदार त्यांना क्या हुआ तेरा वादा असा सवाल करतील असे गायकवाड यांनी सांगितले. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील कॅांग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन मुंबई कॅांग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी कॅांग्रेसने क्या हुआ तेरा वादा या अनोख्या प्रचार मोहिमेची सुरूवात केली.यावेळी या आशयाची स्टीकर्स वाटण्यात आले हे स्टीकर्स या मतदारसंघात लावण्यात येणार आहे. त्यामुळे एक प्रकारे विद्यामान खासदार शेवाळे यांना घेरण्याचा प्रयत्न कॅांग्रेसने सुरू केल्याची चर्चा येथे आहे.

या संदर्भात बोलताना गायकवाड म्हणाले की, गेल्या पाच वर्षात सत्ताधा-यांनी धारावीकरांच्या तोंडाला पानेत पुसली.धारावीच्या पुनर्विकासाच्या केवळ घोषणा करण्यात आल्या. धारावीला औद्योगिक हब बनविण्याची स्वप्ने दाखविण्यात आली.या घोषणा आणि वादे प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र प्रयत्न झालेच नाहीत.नोटाबंदी आमि वस्तु व सेवा करामुळे धारावीतील लघुउद्योग निम्म्यावर आला. तर उर्वरित उद्योग आर्थिक अडचणीत आले आहेत. गे सर्व उघड्या डोळ्यांनी दिसत असताना राहुल शेवाळे मात्र संसदेत मूग गिळून गप्प बसून होते. संपूर्ण पाच वर्षात त्यांनी याबाबत एकही प्रश्न उपस्थित केला नाही.याचा राग धारावीकरांमध्ये असून, या रागाला आम्ही या उपक्रमाच्या माद्यामातून नाट करून दिली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण धारावीमध्ये आहे.

Previous articleशरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा
Next articleशेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला आस्था नाही