पहिला टप्प्यासाठी ३ वाजेपर्यंत ४६.१३ टक्के मतदान

पहिला टप्प्यासाठी ३ वाजेपर्यंत ४६.१३ टक्के मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४६.१३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे. वर्धा ४३.९० टक्के, रामटेक (अ.जा.) ४४.५० टक्के, नागपूर ४१.२५ टक्के,भंडारा-गोंदिया ४९.०५ टक्के, गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ५७ टक्के, चंद्रपूर ४६.३० टक्के आणि यवतमाळ-वाशिम ४३.३५ टक्के.

Previous articleशेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला आस्था नाही
Next articleउर्मिला मातोंडकरने घेतली शरद पवारांची भेट