सेना भाजप युती मजबूत राहिल यासाठी काम करा

सेना भाजप युती मजबूत राहिल यासाठी काम करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता ईशान्य मुंबईत शिवसेना भाजप युती अशी मजबूत राहील यासाठी काम करा अशा सूचना शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसैनिकांना दिल्या.

भाजपा महायुतीचे उमेदवार मनोज कोटक हे लाखोंच्या मतांनी जिंकून येतील असा दावा करत मी आपल्या सोबतच आहे असा विश्वास त्यांनी कोटक यांना दिला. त्याबाबतचा एक व्हिडीओ शिवसेनेच्यानतीने जारी करण्यात आल्याने स्थानिक धुप्या समझोत्याच्या तर्कवितर्कांना पुर्णविराम मिळाला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी भांडुप मधिल सुभाषनगर येथे एका इमारत बांधकांमाच्या भूमिपूजन समारंभासाठी शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील उपस्थित होते. त्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याने काही काळ युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.त्यावर खुलासा करण्यासाठी आ. राऊत यांनी आज  मनोज कोटक यांचाच प्रचार करणार असल्याची कबुली दिली. तसेच शिवसैनिकांनी मनात कोणतेही गैरसमज न बाळगता कोटक यांच्या विजयासाठी जोरदारपणे कामाला लागावे अशा सूचना त्यांनी व्हिडीओच्या माध्यामातुन दिल्या. आपली मराठी संस्कृती आहे. आपण आपल्या विरोधकांनाही शुभेच्छा देतो. तो एक खाजगी कार्यक्रम होता. व्यासपीठावर प्रतिस्पर्धी उमेदवार अचानक आल्याने बोलण्याच्या ओघात त्यांना शुभेच्छा दिल्या याचा अर्थ त्यांना आम्ही पाठिंबा दिला असा होत नाही असे राऊत म्हणाले. शिवसेना मनापासून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचे काम करीत असून, त्यापलिकडे यात काहीही नाही असे ते म्हणाले.

 

 

Previous articleकल्याण, डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंचा झंझावाती प्रचार
Next articleनवमतदारांसाठी “माय फर्स्ट व्होट सेल्फी” उपक्रम