उत्तर मध्य मध्ये तुल्यबळ लढत मात्र पारडे भाजपच्या बाजूने
मुंबई नगरी टीम
मुंबई : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात झालेली लढत ही अत्यंत चुरशीची झाली. भाजपच्या पुनम महाजन आणि कॅांग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यातील लढतीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागून राहिले आहे. तळ्यातमळ्यात करणा-या दत्त यांनी या ठिकाणी चुरस निर्माण केली मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या ठिकाणी भाजप आपला गड राखण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास नकार देणा-या प्रिया दत्त यांनी अखेर या येथून लढण्यास होकार दिला.भाजपच्या उमेदवार पुनम महाजन यांना यावेळची निवडणूक जड जाणार असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत होता.हि जागा आपण खेचून आणू असा विश्वास कॅांग्रेसला आहे. मात्र काल वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार उत्तर मध्यची जागा भाजप जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२०१४ निवडणूक निकाल
१ ) पुनम महाजन – भाजप – ४७८५३५
२ ) प्रिया दत्त -कॅांग्रेस – २९१७६२