वंचितने भाजपाची बी टीम म्हणून काम केले : चव्हाण
मुंबई नगरी टीम
मुंबई : वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात काँग्रेस आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला. त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, त्याचा आम्हाला फटका बसला असे स्पष्ट करीत वंचितने भाजपाची बी टीम म्हणून काम केले अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. वंचित आघाडीने घेतलेल्या भूमिकेमुळे त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला असेही चव्हाण म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश आले नाही याची जबाबदारी स्विकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी या पराभवास ते जबाबदार नाहीत, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.वंचित बहुजन आघाडीमुळे राज्यात काँग्रेस आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला. त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, त्याचा आम्हाला फटका बसला. वंचितने भाजपाची बी टीम म्हणूनच काम केले, त्याचा फायदा मात्र भाजप-शिवसेनेला झाला, असेही चव्हाण म्हणाले.
मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतलेले आहेत, ते कुठेही कमी पडलेले नाहीत. पण ज्या-ज्या राज्यात काँग्रेसची अपेक्षित कामगिरी झालेली नाही, त्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन त्यांना नवी टीम बनवण्यासाठी मोकळीक द्यावी. महाराष्ट्रातील पराभवावर बोलताना चव्हाण म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष या नात्याने या पराभवाची सर्व जबाबदारी मी घेत आहे, त्याबद्दल कोणालाही दोष देत नाही. राज्यातील काँग्रेस पक्षात कसलेही अंतर्गत मतभेद नाहीत.आम्ही सर्वांनी एकमतांनी निर्णय घेतलेले आहेत. या पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनामा देण्यास मी तयार आहे, असेही चव्हाण म्हणाले.